लक्ष्मीचे प्रतीक हत्ती

मध्यंतरी एस्सेल वर्ल्डमध्ये गेलो होतो, तेथे कलरीपय्यट या केरळी मार्शल आर्टचा खेळ पाहायला मिळाला. खेळ सुरू करण्यापूर्वी मार्शल आर्टच्या गुरूंनी हत्तीची पूजा केली आणि नंतर प्रात्यक्षिकांना सुरूवात केली. मी गुरूंची गा घेतली आणि त्यांना हत्तीच्या पुजेमागचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की ही युध्दकला भगवान परशुरामांनी हजारो वर्षांपूर्वी सुरू केली आणि हत्तीच्या पूजनाची परंपरा तेव्हापासूनचीच आहे.

\r\n

हत्तीच्या पूजेची परंपरा फक्त केरळात नाही तर संपूर्ण भारतभरात आढळते. हिंदू परंपरेने हत्ती नेहमीच शुभंकर मानला आहे. प्रत्येक देवालयात हातीच्या प्रतिमा, चित्रे वा शिल्प हटकून दिसेल. लक्ष्मीचं चित्र हत्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दक्षिणेकडील अनेक देवालयात देवाची मूर्ती चार हत्तीच्या आसनावर विराजमान झालेली असते.

\r\n

सोंड उंचावलेले हत्ती लक्ष्मीचे स्वागत करणारे असतात, म्हणून दरवाजाजवळ दोन हत्ती ेवायला हवेत. दरवाजा कोणत्या प्रभागात आहे त्याचा सूक्ष्म विचार करून आणखी चांगले परिणाम आपण मिळवू शकतो.